उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता. त्यावेळी ती तिझ्या रिलेशनशिपवर बोलताना दिसली.
मुंबई । नगर सह्याद्री
उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेदची फॅन फाॅलोइंग जबरदस्त अशी आहे. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अनेकदा सापडत असते. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतात. कपड्यांमुळे उर्फी जावेदला कित्येकदा जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या आहेत.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता. त्यावेळी ती तिझ्या रिलेशनशिपवर बोलताना दिसली. उर्फी जावेद थेट म्हणाली की, मला असा कोणीतरी पाहिजे की, त्याने म्हटले पाहिजे चल काहीतरी तुफानी करूयात.उर्फी जावेद ही काही दिवसांपूर्वीच एका अतरंगी लूकमध्ये दिसली. या लूकमध्ये उर्फी जावेद हिने चक्क सात गुलाबी रंगाच्या शर्टपासून ड्रेस तयार केला होता. आणि तो ड्रेस घालून उर्फी मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसली. उर्फीचा हा लुक पाहून अनेकांना मोठा धक्का बसला.
अनेकांनी उर्फी जावेद हिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली होती परंतु आता उर्फी जावेदला टक्कर देताना एक युवक दिसला आहे. हा तरुण उर्फी जावेद हिच्यासारखीच स्टाईल करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. उर्फी जावेद हिने सात गुलाबी रंगाच्या शर्टपासून ड्रेस तयार केला होता परंतु या तरुणाने एका खाली एक अशा सहा पॅन्ट घातल्या आहेत. हा युवक उर्फी जावेदला टक्कर देत असल्याचे म्हटले जात आहे.
COMMENTS