मनीष रामपाल यादव (३५) असे मृत तरुणाचे नाव असून हा तरुण इलेक्ट्रिकचे दुकान चालवत होता.
नागपूर। नगर सह्याद्री
एका तरुणाने मुलीच्या त्रासाला कंटाळून फेसबुक लाईव्ह लाईव्ह येऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाने व्हिडीओ काढल्यानंतर कन्हान नदीच्या पुलावरून नदीत उडी मारून जीव दिला. घडलेला प्रकार रविवारी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.
मनीष रामपाल यादव (३५) असे मृत तरुणाचे नाव असून हा तरुण इलेक्ट्रिकचे दुकान चालवत होता. रविवारी हा तरुण घरातून गेल्यावर मोबाईलवर व्हिडीओ तयार करून त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर फेसबुक लाईव्ह केले व मोबाईल दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन कन्हान नदीत उडी घेत जीव दिला. तो सायंकाळी घरी न परतल्याने घरच्या व्यक्तीने मोबाईल क्रमांकावर फोन केले. परंतु त्याने ते उचलले नाही.
आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुचाकी दिसल्याने दुचाकीची डिक्की उघडली असता त्यात मोबाईल आढळून आला. त्या मोबाइलमधील व्हिडीओतून घडलेला प्रकार उघडकीस आला. त्याच्या संपर्कात असलेल्या एका मुलीने त्याला जाळ्यात ओडून पैशांची मागणी केली होती. पाच लाख रुपये दिले नाही तर अत्याचाराची तक्रार दाखल करेल अशी धमकी दिल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
COMMENTS