याप्रकरणी तीन कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने भष्ट्राचार होत असल्याचे समोर आले आहे.
पुणे । नगर सह्याद्री
पुण्यामधील राजगुरुनगर पालिकेचे तीन वरिष्ठ कर्मचारी लाच स्वीकारताना आढळून आले आहेत. याप्रकरणामुळे पालिकेतील भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.
राजगुरुनगर पालिकेच्या आरोग्य विभागात पुरवठा केलेल्या साहित्याचे बिल काढण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना चारुबला हरडे यांना एसीबीने पकडले. प्रविण कापसे, श्रीकांत लाळगे या दोन कर्मचाऱ्यांनी लाच स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याने यांना देखील अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी तीन कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने भष्ट्राचार होत असल्याचे समोर आले आहे. पाणी योजना, सांडपाणी योजना, रस्ते याबाबतही भष्ट्राचार होत असल्याची चर्चा नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे लाचलुचपत विभागाकडुन याप्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.
COMMENTS