नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये राणी हिने पती आदित्य चोप्रा यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल वक्तव्य केलं आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी राणी सिनेमांमुळे चर्चेत असायची. परंतु आता राणी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
एका मुलाखतीमध्ये राणीने पतीसोबत सतत भांडण होत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे हि अभिनेत्री चर्चेत आली आहे. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विवाहाचा निर्णय घेतला होता. परंतु अभिनेत्रीने वैवाहिक आयुष्यातील मोठं सत्य सांगितले आहे.
नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये राणी हिने पती आदित्य चोप्रा यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री नेहा धुपिया हिने चॅट शोमध्ये पतीसोबत वाद होतात का? असा प्रश्न विचारला आसता नात्याबद्दल स्पष्ट वक्तव्य केले आहे. त्यामुळे राणी चर्चेत आली आहे.
यावेळी राणी म्हणाली, मी कायम माझ्या पतीसोबत भांडत असते. रोज आमचे वाद देखील होतात. पण माझे पती इतक्या प्रेमाने सर्व गोष्टी करतात त्यामुळे मी त्यांना कायम बोलत असते. आमच्या कुटुंबात जेव्हा वाद होतात ते प्रेमाने होत असतात. आम्ही कधीही कोणावर रागवत नाही. आमच्यात भांडणं होतात. परंतु आम्ही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतो.
COMMENTS