पालकंत्र्यांची भूमिका पालकाची असते, त्रास देण्याची नसते, असे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
आमदार थोरात | दुष्काळ निवारण कामात हलगर्जीपणा करू नका | टंचाई आढावा बैठकीत सूचना
संगमनेर | नगर सह्याद्री
यावर्षी संगमनेरसह राज्यात कमी पाऊस झाल्याने येणारे वर्ष मोठे संकटाचे व दुष्काळाचे असून विविध गावांना टँकरने पिण्याचे पाणी पुरविणे, रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून देणे व आगामी काळात जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे प्रशासनाचे काम आहे. यात कोणीही राजकारण, हलगर्जीपणा करू नका. दुष्काळात जनतेच्या मदतीला प्राधान्य द्या. पालकंत्र्यांची भूमिका पालकाची असते, त्रास देण्याची नसते, असे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शंकरराव खेमनर, इंद्रजित थोरात, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, मीराताई शेटे, अजय फटांगरे, सीताराम राऊत, नवनाथ आरगडे, अशोक सातपुते, अविनाश सोनवणे, सुभाष सांगळे, बी. आर. चकोर, प्रभाकर कांदळकर, तालुयातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, तालुयात अवघा ३९ टक्के पाऊस झाला. या संकट काळात प्रशासनाने जनतेच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा प्रस्ताव आल्यानंतर तातडीने टँकर द्या. ज्या गावांमध्ये दहा मजूर असतील तेथे रोजगार हमीचे काम सुरू करा. पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यास सरकारने पुढाकार घ्यावा. अधिकार्यांनी टंचाई आढावा बैठकीला हजर राहणे अनिवार्य आहे. मंत्र्याकडे जाण्याकरता टंचाई आढावा मीटिंगला अनुपस्थित राहणे अत्यंत गैर आहे. पालकमंत्र्यांची भूमिका पालकाची असते, त्रास देण्याची नसते. आपल्या काळात सुरू केलेल्या ई पीक पाहणीचा प्रोजेट राज्य व देशासाठी दिशादर्शक आहे. सध्याच्या सरकारला त्याचे गांभीर्य नाही. तालुयात विविध पाणी पुरवठा योजनेस जलजीवनमधून ८०० कोटींचा निधी मिळवला आहे. या योजना सुरळीतपणे चालवणे त्या गावांची जबाबदारी आहे.
यावेळी शंकर पा. खेमनर यांचे भाषण झाले. बैठकीस गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS