याप्रकरणी साईराज लोणकर (वय २५, रा. कोंढवा खुर्द), ओंकार कापरे (वय २५, रा. कोंढवा) यांना अटक करून दहा ते अकरा जणांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला
पुणे । नगर सह्याद्री
कोंढवा भागात ढोल ताशा पथकात सरावासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणाचा सासवड परिसरामध्ये खून केल्याचे उघडकीस आले आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती दिल्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
याप्रकरणी साईराज लोणकर (वय २५, रा. कोंढवा खुर्द), ओंकार कापरे (वय २५, रा. कोंढवा) यांना अटक करून दहा ते अकरा जणांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत्यू झालेला तरुण कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरामधील स्थायिक होता. ढोल ताशा पथकात सरावासाठी गेल्यावर परत न परतल्याने कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू या अल्पवयीन मुलाचे लोणकर आणि कापरे यांनी अपहरण करुन त्याला सासवडला नेहल्याचे समोर आले. त्यानंतर या तरुणाला बेदम मारहाण करून केल्याने तो गंभीर जखमी झाला. मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले करत आहेत.
COMMENTS