फोटोमागील जागा पाहून नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला आहे की विजय देवरकोंडासोबत रश्मिका लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. तसेच ती तिझ्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. रश्मिकाच्या साखरपुड्याविषयी आणि लग्नाविषयी विविध अंदाज वर्तवले जात आहे. एवढेच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडासोबत याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदानाचे नाव जोडले जात आहे.
परंतु या दोघांनी कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. सोसिअल मीडिया वरील फोटोमुळे पुन्हा तिच्या रिलेशनशिपची चर्चा होऊ लागली आहे. रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंवरून ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत.
रश्मिकाने तिच्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये गेली होती. त्या लग्नामधील फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या दोन्ही फोटोमागील जागा पाहून नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला आहे की विजय देवरकोंडासोबत रश्मिका लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील विजय देवरकोंडाने याच ठिकाणाहून फोटो शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांकडून फोटोंवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
COMMENTS