ऑनलाइन फ्रॉडला बळी पडलेल्या, पीडित इसमाने दाखल केलेल्या तक्रारीवर एफआयआर आधारित आहे,
मुंबई । नगर सह्याद्री
ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवत तरुणाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणांकडून तब्बल 18 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. मंगळवारी नवी मुंबईतील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
ऑनलाइन फ्रॉडला बळी पडलेल्या, पीडित इसमाने दाखल केलेल्या तक्रारीवर एफआयआर आधारित आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. वेबसाइट्स आणि सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर काही कामे किंवा टास्क पूर्ण करण्यासाठी तरुणाला नोकरीचे आमिष दाखवण्यात आले.
सुरूवातील ते टास्क पूर्ण झाल्यानंतर मोबदला म्हणून त्याला पैसे दिले. परंतु त्यानंतर चांगला परतावा म्हणून काही पैसे भरण्यास सांगितले. त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन तरुणाने 18.36 लाख रुपयांची रक्कम भरली. परंतु त्यानंतर पुन्हा परतवा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली.
COMMENTS