सनी लिओनी बॉलिवूड इंडस्ट्रीत जितकी सक्रीय आहे तितकीच ती सामाजिक भान जपणारी अभिनेत्री आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
भारतीय मनोरंजन विश्वातील महत्वाची अभिनेत्री सनी लिओनी आहे. आजपर्यंत अनेक सिनेमा वेबसिरीज मधुन सनी लिओनीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सनी लिओनी बॉलिवूड इंडस्ट्रीत जितकी सक्रीय आहे तितकीच ती सामाजिक भान जपणारी अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने ऑटिस्टिक मुलांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत रॅम्पवॉक केला.
सनी लिओनीने केरळ राज्यात ऑटिस्टिक मुलांना मदतीचा हात पुढे केला आहे. या मदतीने केरळच्या लोकांच्या हृदयावर एक अनोखी छाप पाडली आहे. सनी लिओनीने या कार्यक्रमामध्ये आशेचा किरण आणला. सनी लिओनीने या कार्यक्रमाची चॉंद लावुन शोभा वाढवली. याशिवाय या अभिनेत्रीने ऑटीस्टीक मुलींच्या हातात हात घालून रॅम्पवॉक केले. यावेळी चालत असताना तिचे डोळे आनंदाने पाणावले होते.
ऑटिस्टिक मुलांचे जीवन सुधारण्यासाठी सनी लिओनीची अतूट बांधिलकी याप्रसंगी दिसून आली. कार्यक्रमाच्या प्रायोजकांनी सनीला या खास गोष्टीसाठी सपोर्ट केला. याप्रसंगी लहान मुलांवरील सनीचे प्रेम दिसुन आले. पिढ्यानपिढ्या टिकून राहणारं प्रेम आणि प्रेमाचा वारसा सोबतीला घेऊन ती या खास मुलांसाठी आशेचे प्रतीक बनली आहे.
सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती तिच्या केनेडी चित्रपटाने जागतिक पातळीवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे. तसेच जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांसारख्या प्रतिभावंतांसमवेत तिच्या कोटेशन गँग या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून ज्याने मिलीयनपेक्षा अधिक व्ह्यूज आहेत.
COMMENTS