यावेळी बोलताना ठुबे म्हणाले, विद्यालयामध्ये शिक्षक आपले कर्तव्य बजावत असतात. यामुळे विद्यालयाचे परिसरात चांगले नाव होते.
कान्हूर पठार | नगर सह्याद्री
येथील जनता मंदीर विद्यालयातील शिक्षकांच्या बदली विरोधात पालकांसह विद्यार्थी आक्रमक झाले. सोमवारी (दि.१८) स्कूल कमिटी सदस्य चंद्रभान ठुबे यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयासमोर पाच तास ठिय्या आंदोलन केले. संस्था कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी बोलताना ठुबे म्हणाले, विद्यालयामध्ये शिक्षक आपले कर्तव्य बजावत असतात. यामुळे विद्यालयाचे परिसरात चांगले नाव होते. यामुळे पटसंख्या वाढीस मदत होते. परंतु कोणतेही ठोस कारण न देता विद्यालयातील सुहास गोर्डे, जयसिंग ठुबे यांची संस्थेने इतर ठिकाणी बदली केली.
या शिक्षकांनी विद्यालयात अनेक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी होत आहे. संस्था कार्यालयाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती केली. मात्र त्यास प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन केले. संस्थेने आठ दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवले.
यावेळी पालक के.पी सोनावळे, गोरक लोंढे, युवा नेते प्रसाद नवले, किरण ठुबे, भोंद्रेचे सरपंच अभिजित झावरे, विरोलीचे माजी सरपंच किशोर रोकडे, सुरज नवले, दीपक सोनावळे, प्रमोद खामकर, आकाश सोनावळे, दीपक लोंढे, प्रशांत नवले, सपंत ठुबे, सोनाली निमसे, पुनम झावरे, सचिन पवार आदी उपस्थित होते.
COMMENTS