उपोषणस्थळी संभाजी भिडे यांनी भेट दिल्याने मनोज जरांगे यांना बळ मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
फडणवीस, शिंदे फसविणार नाहीत; उपोषण मागे घ्या संभाजी भिडे उपोषणस्थळ; मंत्री भुमरे, खोतकर यांचीही शिष्टाई
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. त्यांची जरांगे यांच्याशी चर्चा सुरू असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उपोषण स्थळी दाखल झाले.
मनोज जरांगे यांचे उपोषण स्त्युत्य आणि योग्य असल्याचे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाही, असा विश्वास भिडे यांनी व्यक्त केला. शिंदे आणि फडणवीस लबाडी करणार नाही, असेही ते म्हणाले. ही लढाई एक घाव, दोन तुकडे असे नाही, त्यामुळे हे उपोषण थांबवा अशी विनंती संभाजी भिडे यांनी जरांगे यांना केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते १०० टक्के मिळणार असल्याचे संभाजी भिडे म्हणाले. मी आणि माझे सर्व सहकारी या आंदोलनासोबत आहोत.
... तर उपोषण मागे घेईल
सरकारला वेळ कशासाठी हवा, याचे योग्य कारण दिले पाहिजे. सरकारने योग्य कारण दिले तर आपण दोन पावले मागे यायला तयार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. आरक्षण खरेच देणार का? याचे उत्तर मात्र, मिळायला हवे, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचा उपोषणाचा १५ वा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत आहे. अखेर गावकर्यांनी त्यांना सालाईन घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे जरांगे यांनी सलाईन घेतले. डॉटरांच्या पथकाने रात्री साडेबारा वाजता त्यांची तपासणी केल्यानंतर जरांगे यांना सलाईन लावले. राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांची अनेकदा चर्चा झाल्यानंतरही जरांगे यांनी उपोषण सोडलेले नाही. जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याने गावातील नागरिक त्रस्त आहेत. गावातिल महिला रडत होत्या. अखेर गावातील महिला आणि गावकर्यांचा मान राखत मनोज जरांगे यांनी सलाईन घेण्यास होकार दिला.
COMMENTS