बदलत्या हवनामुळे अनेक समथ्या निर्माण होत असतात, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू अशा अनेक आजारांची साथ पसरते.
मुंबई । नगर सह्याद्री
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येतात. कारण ताप असा असतो जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो. व्हायरल ताप आल्यानंतर तो ताप पुन्हा पुन्हा एका व्यक्तीला येऊ शकतो. तसेच ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने आजारी रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते.
बदलत्या हवनामुळे अनेक समथ्या निर्माण होत असतात, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू अशा अनेक आजारांची साथ पसरते. हे सर्व बदल होत असताना ताप आल्यावर काही लोक अंघोळ करत तर काही नाही. अश्या वेळी तज्ञ काय सांगतात ते आपण जाणून घेणार आहोत.
ताप आल्यानंतर आंघोळ करावी की नाही?
ताप आल्यावर अंघोळ करून नये असे अनेकजण म्हणतात. परंतु ताप आल्यावर आंघोळ कशी करावी किंवा आपली स्वतःची निगा कशी राखावी याबाबत सर्वानी जागृत राहायला हवे. तापामध्ये आपल्या शरीराची निगा राखणे खूप महत्त्वाचे असल्याने कोमट पाणी करून त्यामध्ये कापड भिजवून आपले शरीर स्वच्छ केले पाहिजे. शरीराची स्वच्छता केल्यावर मानसिक दृष्ट्या देखील आपल्याला बरे वाटते.
व्हायरल ताप आल्यानंतर प्रत्येकाने ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेतला पाहिजे. काही लोक ताप आल्यानंतर घरीच औषध घेऊन बरे होण्याचा प्रयत्न करतात, परंतु तसे न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेणे गरजेचे आहे. ताप आल्यानंतर तुम्ही गरम पाणी, वाफ, आल्याचा चहा हे घेऊ शकता यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळण्यास मदत होते.
COMMENTS