देवाचे दर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेचा दोन रिक्षाचालकांनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना डोंबिवली परिसरात घडली आहे.
डोंबिवली परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवाचे दर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेचा दोन रिक्षाचालकांनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना डोंबिवली परिसरात घडली आहे. गस्तीवर असलेल्या मानपाडा पोलीस कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे व धाडसामुळे महिलेचा जीव वाचला व दोन्ही मारेकर्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
डोंबिवली पूर्वेकडील कोळेगाव परिसरात राहणारी महिला शुक्रवारी सायंकाळी खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शनानंतर ती घरी जाण्यासाठी रिक्षात बसली. त्यात आधीच एक प्रवासी बसला होता. महिलेने रिक्षाचालकाला कोळेगाव येथे नेण्यास सांगितले. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा निर्जनस्थळी वळवली. महिलेला संशय येताच तिने आरडाओरडा सुरू केला.
मात्र शेजारी बसलेल्या प्रवाशाने शस्त्राचा धाक दाखवून महिलेला निर्जनस्थळी नेले. गस्तीवर असलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल सुधीर हसे आणि अतुल भोई यांना संशय आला. दोघांनी रिक्षाचा पाठलाग करून मारेकऱ्यांना पकडले. आरोपींनी पोलिस कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस सुधीर हसे गंभीर जखमी झाले.
मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मदने घटनास्थळी पोहोचले. या दोघांनाही पोलिसांनी आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी प्रभाकर पाटील हा रिक्षा चालवतो. त्याचा साथीदार वैभव तरे हा देखील रिक्षाचालक आहे. वैभवची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
COMMENTS