दोघा आई वडिलांनी त्यांची ४ वर्षाची मुलगी तिघा जणांना २ हजार रुपयांना विकली आहे. याप्रकरणामध्ये समाजातील १० पंचांची त्यासाठी सहमती घेतली आहे.
पुणे । नगर सह्याद्री
भीक मागण्यासाठी आईवडिलंनीच चार वर्षाच्या मुलीला २ हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीसांनी मुलीच्या आईवडिलांना अटक केली आहे. अॅड. शुभम शंकर लोखंडे (२६) यांनी आईवडिलांन विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांसह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे वकिल असून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने घडलेल्या घटनेची माहिती दिली. दोघा आई वडिलांनी त्यांची ४ वर्षाची मुलगी तिघा जणांना २ हजार रुपयांना विकली आहे. याप्रकरणामध्ये समाजातील १० पंचांची त्यासाठी सहमती घेतली आहे.
दोघांनी या मुलीला येरवडा येऊन २ हजार रुपयांना भीक मागण्याच्या उद्देशाने बारामती येथील सुपे येथे घेऊन गेले. त्यानंतर तिला गुलाम बनवून जबरदस्तीने भीक मागायला लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मुलीला दत्तक घेतल्याचा दावा या मुलीचा ताबा असलेल्या दाम्पत्याने केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपस पोलीस उपनिरीक्षक नांगरे करीत आहेत.
COMMENTS