इटलीच्या ब्रुसेल्समध्ये टोमॅटो सॉससोबत पुन्हा गरम केलेले जेवण खाल्ल्याने एजे नावाच्या 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
इटली । नगर सह्याद्री
शिळे अन्न खाऊन अनेकदा विषबाधा झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर येतात. अशाच प्रकारचे खाणे २० वर्षीय तरुणाला चांगलाच महागात पडलाय. अन्न पुन्हा गरम करुन खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पाश्चिमात्य देशांमध्ये पाश्ता सारखे फास्ट फूडकडे तरुणांचा कल असतो. असेच फास्ट फूड खाण्याने २० वर्षीय तरुणाला जीव गमवावा लावला आहे. इटलीच्या ब्रुसेल्समध्ये टोमॅटो सॉससोबत पुन्हा गरम केलेले जेवण खाल्ल्याने एजे नावाच्या 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा पाश्ता पाच दिवसांपूर्वी बनवला होता. त्यानंतर तरुणाने पाश्ता पुन्हा गरम करुन खाल्ला. अचानक मळमळ, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने आईवडिलांनी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यानंतर त्यांचा मुलगा मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, पास्ता खाल्ल्यानंतर 10 तासांनंतर म्हणजेच झोपेमध्येच पहाटे 4 वाजता मुलाचा मृत्यू झाला होता. बॅसिलस सेरियस बॅक्टेरियामुळे झालेल्या अन्नातून विषबाधा झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पास्ता बाहेर अनेक दिवस ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया वाढून विषाची एकाग्रता 14.8 μg/g झाली असल्याने मुलाचा मृत्यू झाला.
COMMENTS