घटनेची माहिती मिळताच पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी भोसले, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले.
सांगोला । नगर सह्याद्री
एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने धारदार हत्याराने डोक्यात, गळ्यावर, पाठीवर, मानेवर गंभीर वार करून तरुणीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडलेला प्रकार शनिवारी रात्री ईराचीवाडी (कोळा) ता. सांगोला येथील मृताच्या घरासमोरच घडला.
ऋतुजा दादासाहेब मदने (वय - १९ रा. हिराचीवाडी ता. सांगोला ) असे तरुणीचे नाव असून मुलीचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर यांनी पोलीस ठाण्यात संशयित सचिन मारुती गडदे (रा.गौडवाडी, ता सांगोला) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी भोसले, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला आहे. घडलेल्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
COMMENTS