तक्रारदार तरुण मूळचा नांदेड जिल्ह्यामधील असून काही महिन्यांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये स्थायिक झाला होता.
पुणे । नगर सह्याद्री
आज पहाटेच्या सुमारास टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी यल्लाप्पा आरोटे यांनी या प्रकरणाची फिर्याद दाखल केली आहे.
तक्रारदार तरुण मूळचा नांदेड जिल्ह्यामधील असून काही महिन्यांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये स्थायिक झाला होता. रात्रीच्या दरम्यान अभ्यासिका सुरु असल्याने तिघे मित्र अभ्यास करून पहाटे दुचाकीवरून रूमच्या दिशेने जात होते. त्यादरम्यान टिळक रस्त्यावरील एका स्पोर्ट्सच्या दुकानासमोर आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले.
एकाने त्याला पकडून बाजूला घेऊन गेल्यानंतर गाडीतील कोयता काढून त्यांच्या डोक्यात वार केला. वार हुकावून विद्यार्थ्यानी पोलीस चौकीत धाव घेतली. याप्रकरणी पसार झालेल्या आरोपीचा शोध विश्रामबाग पोलीस करीत आहेत.
COMMENTS