कोल्हापुरमध्ये कुणबी दाखल काढण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोल्हापूर । नगर सह्याद्री
मराठा आंदोलन आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत, आणि दुसरीकडे कोल्हापुरमध्ये कुणबी दाखल काढण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचे रॅकेट कोल्हापूरमध्ये उघड झाले असून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कुणबी दाखला काढण्यासाठी सांगेल तितके पैसे न दिल्याने पूर्वीच्या कागदपत्रांतील ‘कु’चे कुळवाडी म्हणजे मराठा आहे, असे म्हणून तुम्हाला दाखल येईल. अशी उत्तरे सरकार केंद्रचालकाकडून मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दिलेल्या पैशांमध्ये तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालय वाटेकरी असल्याचा आरोप नागरिकांकडून केले जात आहेत.
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका, असं कुणबी समाजाने म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारने दबावात येऊन निर्णय घेतला तर मराठा समाजापेक्षाही देशभरात मोठं आंदोलन करू असा इशारा कोल्हापूरमधील नागरिकांनी दिला आहे.
COMMENTS