याबाबत शिंदे गटाच्या ३९ आमदारांना तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
मुंबई । नगर सह्याद्री
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १४ सप्टेंबरपासून आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू होणार आहे. आमदारांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मागविल्यानंतर आता याची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होणार आहे.
याबाबत शिंदे गटाच्या ३९ आमदारांना तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती अपात्र ठरवली होती, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योग्य वेळी आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे आपल्या आदेशात म्हटले होते.
याप्रकरणी सुनावणीची नोटीस १४ एप्रिल रोजी १२ वाजेची वेळ कळविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये स्वत: किंवा वकिलांनी आपली बाजू अध्यक्षांसमोर मांडण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार आपण आपली बाजू मांडणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते अजय चौधरी यांनी सांगितले.
COMMENTS