सोमवारी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय व आष्टा ग्रामीण रुग्णालयास 2 कोटी 25 लाख रुपये किंमतीच्या डायलिसिस मशीन व वैद्यकीय उपकरणे देण्यात आली.
सांगली । नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या रोखठोक भाषणामुळे कायम चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या भाषणाला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सोमवारी जयंत पाटील सांगली दौऱ्यावर होते त्यावेळी कसबे डिग्रज गावामध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सांगलीच्या कसबे डिग्रज गावामध्ये रुग्णालय उभारणार होते. सर्व तयारी झाली होती परंतु एकनाथ शिंदे यांनी एक्का काढला आणि आम्ही मांडलेला पत्त्यांचा डाव हरलो. त्यांच्या या विधानानंतर कार्यक्रमामध्ये सर्वजण हसू लागले. सोमवारी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय व आष्टा ग्रामीण रुग्णालयास 2 कोटी 25 लाख रुपये किंमतीच्या डायलिसिस मशीन व वैद्यकीय उपकरणे देण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटील म्हणाले, आरोग्याच्या सुविधांबाबत आम्ही कधीच हुशार नव्हतो. कोरोना आल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या सुविधांचे महत्त्व समजले. दवाखान्यामध्ये गेलेली माणसे खूप कमी प्रमाणात बाहेर आली. आता व्हाईट पेपर काढला पाहिजे, की कोणाच्या हॉस्पिटल मध्ये किती लोकं आत गेली आणि किती लोकं डायरेक्ट वर गेली. कोरोना काळात असेही काही हॉस्पिटल होते की एखादा श्रीमंत माणूस आला, की गरीबांचा ऑक्सिजन काढून ते श्रीमंत व्यक्तीला लावायचे,असे उद्योग वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये झाल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
COMMENTS