नगर सह्याद्री टीम Multibagger Return : शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांच...
नगर सह्याद्री टीम
Multibagger Return : शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर्स झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका सोलर शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत 30 रुपये होती.
हा शेअर्स आता 875 रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या 3 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 2844 टक्के परतावा दिला आहे. ही एक सोलर कंपनी आहे. या शेअरचे नाव KPI Green Energy Ltd आहे. या शेअरची किंमत 3 वर्षांपूर्वी 30 रुपयांच्या पातळीवर होती आणि आज हा शेअर 875.00 च्या पातळीवर पोहोचला आहे.
कंपनीचा नफा किती झाला?
KPI ग्रीन एनर्जीने जून 2023 तिमाहीत 190.6 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 122.8 कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत नफा वाढून रु. 33.3 कोटी झाला आहे जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 22.2 कोटी होता. पहिल्या तिमाहीत ऑपरेटिंग नफा वाढून रु. 69.3 कोटी झाला, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 41.9 कोटी होता.
कंपनीचा व्यवसाय काय आहे?
केपीआय ग्रीन एनर्जी ही सौरऊर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे. 'सोलारिझम' या ब्रँड नावाखाली इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर (IPP) आणि कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर (CPP) ची सुविधा उपलब्ध करून देणे हे या कंपनीचे लक्ष आहे. यासोबतच ग्राहकांना सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यावरही या कंपनीचा भर आहे.
(डिस्क्लेमर: येथे केवळ ज्ञानाकरिता शेअर्सची माहिती दिली आहे. आम्ही गुंतवणुकीचा सल्ला देत नाहीत)
COMMENTS