नवी दिल्ली / नगर सह्याद्री पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काम करत असतात. ते सुट्टी न घेता अविरत कार्यरत असल्याचा दावा भाजपकडून वारंवार ह...
नवी दिल्ली / नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काम करत असतात. ते सुट्टी न घेता अविरत कार्यरत असल्याचा दावा भाजपकडून वारंवार होतो. आता या संदर्भात माहिती अधिकाराच्या अंतर्गत एका व्यक्तीनं माहिती मागवली होती. पंतप्रधान मोदी किती दिवस सुट्टीवर गेले असा प्रश्न या अंतर्गत विचारला होता.
त्यावर मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याचं उत्तर मिळालय. प्रफुल्ल पी. शारदा नावाच्या व्यक्तीनं आरटीआयच्या माध्यमातून मोदींच्या सुट्ट्यांबद्दल माहिती मागितली होती. आपल्या अर्जात त्यांनी दोन प्रश्न विचारले होते.
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी दिल्लीस्थित पंतप्रधान कार्यालयात किती दिवस उपस्थित होते? आणि पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी विविध कार्यक्रमांमध्ये किती दिवस हजर राहिले? या अर्जास उत्तर मिळालं आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी एकही सुट्टी घेतलेली नाही, अशा माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.
याशिवाय नरेंद्र मोदींच्या विविध कार्यक्रमांची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, असं उत्तर दुसऱ्या प्रश्नाला देण्यात आलं. मोदी हे नेहमी कार्यशील असतात असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांच्याबद्दल सदर व्यक्तीने माहिती मागविली. सदर माहितीला उपर्युक्त उत्तर मिळाले आहे.
COMMENTS