मुंबई / नगर सह्याद्री Rain Update : राज्यात पावसाने बहुतांश ठिकाणी अजून समाधानकारक हजेरी लावलेली नाही. काही ठिकाणी सध्या थोडाफार बरसत आहे....
मुंबई / नगर सह्याद्री
Rain Update : राज्यात पावसाने बहुतांश ठिकाणी अजून समाधानकारक हजेरी लावलेली नाही. काही ठिकाणी सध्या थोडाफार बरसत आहे. हवामान खात्याकडून पावासाबाबत अपडेट आली आहे.
काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातल्या २२ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, लातूर, नांदेड, परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळ,
अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलक्याचे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे सांगण्यात येतेय. त्यामुळे चक्रीय वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभर पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
COMMENTS