पोलिसांनी तपास केल्यानंतर चिमुकलीच्या मृत्यूचा बनाव केल्याचे उघडकीस आले.
अकोला । नगर सह्याद्री
पती-पत्नीमध्ये वादामध्ये चिमुकल्या मुलीचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. अकोला शहरामध्ये आईनेच पोटच्या मुलीची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणाची फिर्याद मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
उत्तरीय तपासणी अहवालातून हत्येचा उलगडा झाला आहे. साडेपाच वर्षीय लहान मुलगी झोपली असताना नाकाला चिमटा लावून झोपली असा बनाव तिच्या आईने केला होता. मुलीचे वडील रवी आमले यांना संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी तपास केल्यानंतर चिमुकलीच्या मृत्यूचा बनाव केल्याचे उघडकीस आले. मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. याप्रकरणी मुलीची आई विजया आमले यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खदान पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
COMMENTS