अलीकडेच रिंकूच्या सर्वच सोशल मिडीयावरील पोस्ट तिने हटवल्या होत्या.
मुंबई / नगर सह्याद्री
मुंबई | सैराट फेम रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर एका कारणामुळे प्रचंड चर्चेत आहे. रिंकूने तिच्या सोशल मीडियावरील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्या आहेत, अशी चर्चा होत होती. नेमकं असं का केलं याचं उत्तर नुकतंच रिंकूने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दिलंय. अलीकडेच रिंकूच्या सर्वच सोशल मिडीयावरील पोस्ट तिने हटवल्या होत्या.
तिने सोशल मिडीयाला राम राम ठोकते की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. रिंकु म्हणाली, सर्वांना नमस्कार. माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. आणि आता सर्व व्यवस्थित झालेलं आहे. येत्या काही दिवसांत मी माझ्या अकाऊंटवरून पोस्ट टाकायला सुरुवात करेल. प्रेक्षकहो तुमच्या प्रेमाबद्दल आणि दाखवलेल्या काळजीबद्दल मनापासून आभार. तिने स्वतःहुन एकही पोस्ट झालेली नाही, असं देखील तिने स्पष्ट केलेलं आहे.
रिंकू कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल ८ लाखांहून जास्त फॅन्स आहेत. रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रिंकूने फिल्म इंडस्ट्रीमध्ये २०१६ मध्ये सैराट’मधून डेब्यू केलं. त्यानंतर तिने काही वेबसीरीज आणि चित्रपटांतही मुख्य भूमिका साकारली होती. कागर, झुंड, अनपॉस सह अन्य कलाकृतींमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. सध्या तिचा चाहतावर्ग तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे.
COMMENTS