Post Office FD SCheme,Post Office Time Deposit
Post Office FD SCheme : सध्या प्रत्येकालाच गुंतवणुकीचे महत्व समजले आहे. त्यामुळे प्रत्येक जण पैशांची व्यवस्थित गुंतवणूक करत असतो. परंतु पैसे गुंतवताना सेक्युरिटी देखील तितकीच महत्वाची आहे.
त्यामुळे तुम्ही पोस्टाची एफडी स्कीम घेऊ शकता. यात तुम्ही पैसे गुंतवले तर अल्पवधीतच तुमचे पैसे डबल होतील. पोस्ट ऑफिस एफडीला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट म्हणतात. तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी एफडीचा पर्याय मिळतो. तुम्ही यामध्ये १० वर्षांसाठी पैसे जमा केल्यास, तुम्ही तुमची रक्कम दुप्पट होऊ शकते. सध्या ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के दरानं व्याज मिळत आहे.
५ लाखांचे दहा लाख कसे होतील ? : सध्या पोस्ट ऑफिस एफडीवर ७.५ टक्के दरानं व्याज देतंय. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ५ लाख रुपये जमा केले तर ७.५ टक्के दरानं तुम्हाला त्यावर २,२४,९७४ रुपये व्याज मिळेल.
अशा प्रकारे, याचाच अर्थ ५ वर्षांत तुमची रक्कम ७,२४,९७४ रुपये होईल. तीच रक्कम पुन्हा ५ वर्षांसाठी गुंतवा. म्हणजे तुम्हाला मॅच्युरिटीनंतर १० लाख ५१ हजार १७५ रुपये मिळतील. ही रक्कम दुपटीपेक्षाही अधिक आहे.
Post Office Time Deposit वर किती आहे व्याज?
१ वर्षासाठी ६.९ टक्के व्याज
२ वर्षांसाठी ७ टक्के व्याज
३ वर्षासाठी ७ टक्के व्याज
५ वर्षासाठी ७.५ टक्के व्याज
COMMENTS