हे प्रकरण मिलींद निकम यांनी मिटविण्यासाठी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर पाच लाख रुपये देण्याचे ठरले.
ठाणे । नगर सहयाद्री
भिवंडी येथील नियंत्रण कक्षाचे पोलीस पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मिलींद निकम यांना निलंबित करण्यात आले आहे. तक्रारदार यांच्याविरोधातील प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी ही लाच असल्याचे मागितली असल्याचे समोर आले आहे.
तक्रारदार हे भिवंडीमध्ये राहत असून पोलीस नाईक मिलींद यांच्याशी महिन्याभरापूर्वी संपर्क साधला होता. त्यांच्याविरोधात एक महिला शांतीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करणार होती. परंतु हे प्रकरण मिलींद निकम यांनी मिटविण्यासाठी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर पाच लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी निकम यांना पाच लाख रुपये दिले परंतु तरीदेखील तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली.त्यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद दाखल केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास केल्यावर निकम यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी निकम यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS