नगर सह्याद्री टीम PF Account : आपल्यातील बहुतांश लोकांचे ईपीएफ खाते असते. तसेच अनेकांनी कर्ज देखील घेतलेलं असेल. परंतु तुम्हाला या दोन्ही ...
नगर सह्याद्री टीम
PF Account : आपल्यातील बहुतांश लोकांचे ईपीएफ खाते असते. तसेच अनेकांनी कर्ज देखील घेतलेलं असेल. परंतु तुम्हाला या दोन्ही संदर्भात तुमच्या फायद्याची माहिती आम्ही या ठिकाणी देणार आहोत.
आपल्यातील बरेच लोक कर्ज घेतात. परंतु अनेकांना दीर्घकाळापर्यंत व्याज देणे टाळायचे असते, यासाठी ते वेळेपूर्वी कर्जाची परतफेड करण्याचा पर्याय शोधत राहतात. ईपीएफ खात्यात पडून असलेली रक्कम याला पर्याय ठरू शकते. तुम्ही तुमच्या होमलोनसाठी EPF खात्यातून पैसे काढू शकता का? ते किती फायदेशीर राहील ? चला जाणून घेऊयात -
जर तुमचा ईपीएफचा व्याजदर कमी असेल आणि तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर जास्त असेल तर तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यातून गृहकर्ज फेडू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीला हा पर्याय देखील निवडू शकता. कारण पैसे जमा करण्यासाठी तुमच्याकडे जास्त वेळ असेल.
PF Account मधून 90 टक्के रक्कम काढून गृहकर्जाची परतफेड करता येते : मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPFO ला गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त 90 टक्के ठेव रक्कम काढण्याची परवानगी द्यावी लागेल. मात्र, यासाठी तुमच्या सेवेची 10 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.
तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँक, नोंदणीकृत सहकारी संस्था, राष्ट्रीय गृहनिर्माण मंडळाकडून गृहकर्ज घेतले असेल तरच तुम्ही EPF मधून पैसे काढू शकता हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे कसे काढायचे ? : यासाठी सर्वप्रथम तुम्हाला EPFO ई-सेवा पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि पासवर्ड टाका. ऑनलाइन सेवांवर क्लिक करा. यानंतर फॉर्म 31 द्वारे क्लेम करा. तुमची बँक माहिती प्रविष्ट करा. पैसे काढण्याचे कारण निवडा. तुमची कागदपत्रे अपलोड करा.
COMMENTS