परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न राजस्थान येथे पार पडणार पडणार असून ते देखील शाही पद्धतीने पार पडणार आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे त्यांच्याअत्यंत खास लोकांना निमंत्रण नात्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव यांचा साखरपुडा १३ मे रोजी शाही थाटात पार पडलाय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी साखरपुड्याला अत्यंत खास लोकांना निमंत्रण दिले होते. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आपल्या कुटुंबियांसोबत साखरपुड्याला सहभागी झाले होते.
इतकेच नाही तर परिणीती चोप्रा हिची बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील या साखरपुड्यामध्ये सहभागी झाली होती. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही विदेशामध्ये झाल्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगत होती.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यानंतर चाहते हे यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न राजस्थान येथे पार पडणार पडणार असून ते देखील शाही पद्धतीने पार पडणार आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 23 आणि 24 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 30 सप्टेंबरला चंदीगडमध्ये रिसेप्शन होणार आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे काही दिवसांपूर्वीच उज्जैन येथे मंदिरात दर्शन करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे राजस्थानमध्येही गेले होते. सध्या सोशल मीडियावर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत.
COMMENTS