व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी केले.
वसंत लोढा | व्याख्यानमाला संयोजन समितीची बैठक
अहमदनगर | नगर सह्याद्री
पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून देशात नावाजलेले वक्ते प्रगल्भ व प्रबोधनात्मक विचार मांडत आहेत. राष्ट्र समर्पित विचारांची ही व्याख्यानमाला नगरच्या श्रोत्यांसाठी वैचारिक पर्वणी असून व्याख्यानमालेची नगरकर आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी सप्टेंबरच्या २३ ते २५ तारखे दरम्यान पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेत तिन्ही दिवस राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात व्यक्तिमत्व हजेरी लावणार आहेत. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी केले.
पंडित दीनदयाळ पतसंस्था व दीनदयाळ परिवाराच्या वतीने नगर शहरात पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेच्या संयोजन समितीची बैठक लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर, दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, संचालक मिलिंद गंधे, बाबासाहेब साठे, नीलेश लोढा, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, सचिन पारखी, फिरोज तांबटकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात धनंजय तागडे म्हणाले, गेल्या ६ वर्षापासून नगरमध्ये पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे उत्कृष्टपणे आयोजन केले जात आहे. व्याख्यानमाला समितीचे सदस्य घेत असलेल्या परिश्रमाने ही व्याख्यानमाला यशस्वी होत असल्याने राज्यात व्याख्यानमालेचे नावलौकिक वाढत आहे. दरवर्षी श्रोत्यांचा प्रतिसाद वाढतच आहे. सर्वप्रकरचे अत्याधुनिक व डिजिटल तंत्रज्ञान या व्याख्यानमालेसाठी वापरण्यात येणार आहे. संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी आपापली जबाबदारी पार पाडून ही व्याख्यानमाला यशस्वी करावी, असे आवाहन केले.
बैठकीस उद्योजक अनिल जोशी, किशोर बोरा, महेश नामदे, एन.डी.कुलकर्णी, नरेंद्र श्रोत्री, सुरज अग्रवाल, अशोक कानडे, सुनील रामदासी, सिए ज्ञानेश्वर काळे, अरुण ठाणगे, कुणाल भंडारी, नितीन शेलार, कैलास गर्जे, राजकुमार जोशी, सागर शिंदे, अशोक बकोरे आदी सदस्य उपस्थित होते. दीनदयाळ परिवाराचे सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी आभार मानले.
COMMENTS