मुन्ना मोमीन शेख असे अपघातात मृत्यू झाले असून आशिष रामदास जवरे (रा.शेवगाव, जिल्हा अहमदनगर ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे । नगर सह्याद्री
पुणे सोलापूर महामार्गावर कदमवस्ती नजीक हाॅटेल मनाली परिसरात अपघात झाला. पाठीमागून येणाऱ्या टेम्पोच्या खाली दुचाकीस्वार येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटेच्या दरम्यान झाला.
मुन्ना मोमीन शेख असे अपघातात मृत्यू झाले असून आशिष रामदास जवरे (रा.शेवगाव, जिल्हा अहमदनगर ) हे गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या दरम्यान रिमझिम पाऊस पडल्याने पुणे सोलापूर महामार्गावरून पुण्याकडे जाणार्या मार्गावर एका दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले.
घसरून पडल्याने पाठीमागून येत असलेल्या अवजड वाहनाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार उमेश ढाकणे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमी रुग्णास ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
COMMENTS