आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी जामखेड शहरातील खर्डा चौकात रविवारी दिड तास रस्ता रोको आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी करण्यात आले.
जामखेड | नगर सह्याद्री
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे तेरा दिवसापासून उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आठ दिवसा पूर्वी जामखेड तालुका बंद ठेवून सरकारचा निषेध करण्यात आला होता. परंतु शासनाकडून अद्याप निर्णय घेण्यात आला नाही म्हणून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा व सरकारने आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी जामखेड शहरातील खर्डा चौकात रविवारी दिड तास रस्ता रोको आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी करण्यात आले.
मराठा आरक्षण व मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौकात रवीवारी सुमारे दिड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे तीन रस्त्यावर एक कि. मी. लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे, मंगेश आजबे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष जयसिंग उगले, धनंजय भोसले, कु. ज्ञानेश्वरी भोगल, गणेश हगवणे, प्रदिप भोरे, आकाश भोंडवे, अशोक यादव, जाकीर शेख, नय्युम सुभेदार केदार रसाळ यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण चिरडण्यासाठी लाठीहल्ला केला, सरकार दुर्लक्ष करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने शैक्षणिक व नौकरीतील संधी गेल्या आहेत. मराठा आरक्षण आता मिळाले नाही तर २०२४ च्या निवडणुकीत धडा शिकवू असा इशारा देऊन राज्य सरकारचा निषेध केला.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत म्हणाले, जालना येथील आंदोलनात मराठा साजातील महिला, पुरुषांवर, व अबाल वृद्धांवर जो लाठचार्ज करण्यात आला त्याचे आदेश खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच दिले होते म्हणून त्यांनी नैतीक जबादारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा व मराठा समाजातील महिला पुरुषांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ माघे घ्यावे. सारथी या सरकारी संस्थेची निर्मिती ५२ मराठयांच्या बलिदानातून झाली आहे त्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये असेही मत मांडले. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या जिवाचं जर काही बर वाईट झालं तर अमदार, मंत्री, खासदार यांचे हातपाय मोडले जातील असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आण्णासाहेब सावंत यांनी दिला. यावेळी मंगेश आजबे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.
COMMENTS