नगर सह्याद्री टीम Nio आपला पहिला स्मार्टफोन 21 सप्टेंबर रोजी चीनमध्ये लॉन्च करणार आहे. त्याचे नाव निओ फोन असेल. कंपनी ते लॉन्च करण्यासाठी प...
नगर सह्याद्री टीम
Nio आपला पहिला स्मार्टफोन 21 सप्टेंबर रोजी चीनमध्ये लॉन्च करणार आहे. त्याचे नाव निओ फोन असेल. कंपनी ते लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
गेल्या महिन्यातच AnTuTu च्या डेटाबेसवर फोन दिसला होता. आता Nio Phone 3C सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मच्या डेटाबेसमध्ये दिसला आहे. या स्मार्टफोनचा चार्जिंग स्पीड समोर आला आहे. याशिवाय इतरही अनेक माहिती समोर आली आहे.
Nio Phone
एक स्क्रीनशॉट समोर आला आहे. त्यांसुर हा फोन अशा चार्जरसह येऊ शकतो जो 100W पर्यंत फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. परंतु बॅटरीच्या साइज बद्दल अद्याप काहीही माहिती नाही. कंपनीने अलीकडेच चीनमध्ये EC6 SUV ची घोषणा केली आहे, ज्याची किंमत 358,000 युआन (41,45,626 रुपये) आहे. कंपनीने लॉन्च इव्हेंटमध्ये कारचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये फोनचा फ्रंट डिझाईनची झलक पाहायला मिळाली होती.
पहिली झलक
फोनमध्ये 6.7-इंचापेक्षा मोठा डिस्प्ले असेल अशी अपेक्षा आहे. फोनच्या डाव्या बाजूला कस्टम बटण दिसत आहे. हा फोन वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट देऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निओ फोनचे अपेक्षित फीचर्स
निओ फोनबद्दल आतापर्यंतच्या अहवालात असे दिसून आले आहे की हा हाय-एंड हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह एक प्रीमियम स्मार्टफोन असेल. हे 120Hz AMOLED डिस्प्ले, 3.36GHz Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, LPDDR5x रॅम, UFS 4.0 स्टोरेज, ट्रिपल कॅमेरा युनिट आणि Android 13 सह येईल.
डिव्हाइस तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होईल
12GB RAM + 1TB स्टोरेज
16GB रॅम + 512GB स्टोरेज
16GB RAM + 1TB स्टोरेज
COMMENTS