पहिल्या अर्जामध्ये विक्रम काळे, सतीष चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे यांचा यामध्ये समावेश होता.
मुंबई । नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात आराखडा योजला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी आता राष्ट्रवादीकडून अर्ज केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषद सभापतीकडे हा अपात्रतेसाठीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील ४ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी अर्ज केला होता. पहिल्या अर्जामध्ये विक्रम काळे, सतीष चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे यांचा यामध्ये समावेश होता. अपात्रतेच्या कारवाईसाठी एक अर्ज पुरेसा असताना, दोन स्वतंत्र अर्ज केले आहेत. त्यामुळे शरद पवार यांची यापाठीमागे काही खेळी आहे का? यासंदर्भात तर्क-वितर्क लावले जात आहेत.
शरद पवार गटाकडून अपात्रतेचा अर्ज दाखल होताच अजित पवार गटातील आमदारांचं टेन्शन वाढले असून अपात्रतेच्या कारवाईचा धसका घेतलेल्या काही आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत संपर्क साधला. नव्याने अपात्रतेची नोटीस काढलेल्या आमदारांपैकी काही आमदार पवारांच्या संपर्कात आहेत. शरद पवार यांच्या या नव्या खेळीमुळे अजित पवार गटामध्ये चिंता वाढली आहे. अपात्रतेची कारवाई असलेले संबंधित आमदार माघारी आल्यास त्यांच्या अपात्रतेसंदर्भात पुनर्विचार होणार आहे.
मंत्री झालेल्या ९ जणांविरोधात राष्ट्रवादीची कारवाई कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. कळत नकळत आपल्यातील काही सहकारी हळूच एक शंका काढतात. आता झालंय ते ठीक आहे, आम्ही कामाला लागतोय, परंतु, ते परत आल्यावर काय? अशी शंका मला अनेकजण विचारतात. ते सर्व डोक्यातून काढून टाका, आपण यासंबंधीचे निर्णय घेणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS