बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील अनिकट रोड भागात हा धक्कादायक समोर आला आहे.
बुलढाणा । नगर सह्याद्री
गेल्या कित्येक दिवसांपासून मानसिक ताणावात असलेल्या तरुणांने रात्रीच्या सुमारास धारधार चाकू फिरवत स्वतःची आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडलेली घटना खामगाव शहरात घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील अनिकट रोड भागात हा धक्कादायक समोर आला आहे. आकाश प्रमोद खाकरे (२८) आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाशने काल रात्रीच्या दरम्यान चाकुने स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबियांनी त्याची खोली उघडली असता घटना समोर आली.
मागील कित्येक दिवसांपासून आकाश प्रमोद खाकरे हा युवक मानसिक तणावात होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मृतकचे काका अजय खाकरे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
COMMENTS