नगर सह्याद्री टीम Weather Updates : मागील काही दिवसांत पावसाने दडी मारली होती. परंतु मागील काही दिवसात पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरवा...
नगर सह्याद्री टीम
Weather Updates : मागील काही दिवसांत पावसाने दडी मारली होती. परंतु मागील काही दिवसात पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरवात केली. दरम्यान आता अहमदनगरसह अनेक जिल्ह्याना अलर्ट दिला आहे. आता पाऊस जोरदार हजेरी लावू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पावसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. मुंबईसह, पुण्यातही आज मुसळधार पाऊस होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्यात हळुहळू पावसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून आज बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण,मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
त्याचबरोबर मुंबई, पुणे, ठाण्यासह पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या तसेच मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
COMMENTS