पुणे / नगर सह्याद्री : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान ...
पुणे / नगर सह्याद्री : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यान वर्तवलाय. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे पुढील ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याबाबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात आजपासून आणि राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
याशिवाय कोकण किनारपट्टीलगत आजपासून पावसाचा जोर देखील वाढणार आहे. पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
परंतु अद्यापही मोठा पाऊस नाशिकमध्ये झालेला नाही. अनेक तालुक्यांमध्ये पाण्याचा एकही थेंब न पडल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे येआता सर्वांच्याच नजरा पावसाकडे लागल्या आहेत.
COMMENTS