मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले.
जालना । नगर सह्याद्री
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मध्यरात्रीपासून पाणी आणि सलाईनचा त्याग केला आहे. त्यामुळे आरक्षणासाठी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. जरांगे यांच्या आंदोलनंतर अंतरवाली सराटी (ता. अंबड) परिसरातील तीनशेहून अधिक गावांमध्ये स्थानिक पातळीवर आंदोलने सुरू झाली आहेत.
राज्य सरकारमधील मंत्री यांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांच्या शिष्टमंडळाची मुंबईतही बैठक झाली. परंतु तोडगा न निघाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र घेऊन खोतकर शनिवारी अंतरवाली सराटीत घेऊन पोहचले होते. त्यानंतर जरांगे यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती. मात्र जरांगे उपोषणावर ठाम राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी तपासण्या व उपचार करण्यास देखील मनाई केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत नाही. परंतु, इतर समाजाला धक्का न लागता त्यावर तोडगा निघाला पाहिजे,असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
COMMENTS