आरोप करणाऱ्याला म्हणावं, तू तुझे उद्योग बघ. आमच्या लफड्यात पडू नको. हे खानदानी पोरांनी उभं केलेलं आंदोलन आहे. राजकारण्यांनी केलेलं नव्हे.
जालना । नगर सह्याद्री
मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय घेण्यासाठी वेगवेगळी कारणं देऊन सरकारने जास्तीचा वेळ मागू नये. हा तिढा सोडवण्यासाठी हवे तितके पुरावे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देता येतील एवढे पुरावे आमच्याकडे आहेत. हैदराबादपासून मुंबईपर्यंतचे पुरावे गोळा केले आहेत. सरकारने केवळ याबाबत वटहुकूम काढण्याची आवश्यकता आहे.
यावेळी मनोज जरांगे यांना विचारले की, तुमचं हे आंदोलन पक्षाच्या ध्येयधोरणाने सुरू असून तुम्ही केवळ सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताय असा आरोप केला जात आहे. या आंदोलनामध्ये राजकारण शिरलंय असं तुम्हाला वाटतंय का?, यावर मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, हे उपोषण जातीवंत तरुणांनी उभे केले असून हा लढा आहे, हे कुठल्या राजकीयांचे आंदोलन नाही. माझ्या समाजाला माहिती आहे मी काय करतोय आणि मलाही माहिती आहे माझा समाज काय आणि कसा आहे.
आरोप करणाऱ्याला म्हणावं, तू तुझे उद्योग बघ. आमच्या लफड्यात पडू नको. हे खानदानी पोरांनी उभं केलेलं आंदोलन आहे, राजकारण्यांनी केलेलं नव्हे. ही सगळी जातीवंत पोरं आहेत. महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील गरिबांची मूल आहेत. आम्ही आमच्या भाकऱ्या आणतो, आमची चटणी खातो आणि उघड्यावर झोपतो. उगाच आमच्या आंदोलनाला डाग लावण्याचा प्रयत्न केला तर, तुझं टमरेलच वाजवेन. मनोज जरांगे म्हणाले, राज्य सरकारने मागितलेल्या कालावधीबाबत चार दिवसांचा वेळ दिला होता.आज दुसऱ्या दिवशी योगायोगाने मंत्रिमंडळ बैठकही झाली असून एक मंत्रिमंडळ बैठक झाली आहे.
COMMENTS