घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले.
अहमदनगर । नगर सह्याद्री
कसारा येथील वीर तानाजीनगर परिसरामधील प्रेमीयुगुलानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमनाथ सोनवणे (२३) आणि सुजाता देशमुख (२१) या दोघांनी गळफास घेऊन त्यांची जीवनयात्रा संपवली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. या दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. सोमनाथ आणि सुजाता हे मूळ अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील स्थायिक आहेत. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दीड महिन्यांपूर्वी दोघेही घर सोडून कसारा येथील तानाजीनगर परिसरामध्ये स्थायिक झाले होते.
सोमनाथ आणि सुजाताने १२ सप्टेंबर रोजी ओढणीने गळफास घेतला होता. घरमालकाला दोघांचेही मृतदेह एकमेकांच्या बाजूला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी तातडीने या घटनेची माहिती कसारा पोलिसांना दिली. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहीली नसल्याने मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही.
COMMENTS