खून करणाऱ्या चंद्रशेखर कापरे आणि त्याच्या टोळीतील १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
पुण्यामधून धक्कादायक प्रकार घडला आहे. ढोलपथकामध्ये सरावासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करणाऱ्या चंद्रशेखर कापरे आणि त्याच्या टोळीतील १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारांना आळा बसणार आहे.
कोंढवा येथील १६ वर्षीय मुलगा महापालिकेच्या शाळेच्या पाठीमागील ढोलपथकामध्ये सराव करण्यासाठी गेला होता. मात्र, उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी कोंढवा पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
कोंढवा पोलिसांनी आयपीसी ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला. त्यानंतर दिवेघाटाजवळ बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला. आरोपींनी कोंढवा येथून मुलाचे कारमधून अपहरण केले. मंतरवाडीजवळ लाकडी दांडक्याने मारहाण करून मुलाचा खून करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवत ओंकार चंद्रशेखर कापरे (वय २७, रा. कोंढवा खुर्द), साईराज लोणकर (वय २३, रा. उंड्री), प्रणय पवार (वय १९), सौरभ ऊर्फ दत्ता तायडे (वय १८), कृष्णा जोगदंडे (वय २०), महादेव ऊर्फ पप्पू गजाकोष (वय १९), रोहन अनिल गवळी (वय २१, सर्व रा. कोंढवा खुर्द) यांना अटक केली होती.
याशिवाय दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे आरोपी राज ठोंबरे आणि अमन ((पूर्ण नाव नाही) हे फरार आहेत. या प्रकरणी चंद्रशेखर कापरे आणि त्याच्या टोळीतील १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध कोंढवा व वानवडी पोलीस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
COMMENTS