नगर सह्याद्री टीम Jawan Movie Released : शाहरुख खानचा जवान हा सिनेमा 7 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळेल अशी अपेक...
नगर सह्याद्री टीम
Jawan Movie Released : शाहरुख खानचा जवान हा सिनेमा 7 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाची क्रेझ एवढी आहे की, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच देशभरात साडेसात लाखांहून अधिक तिकिटे बुक झाली आहेत.
आणखी एक खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे शो पहाटे 5.30 ते 6 वाजल्यापासून सुरू झाले आहेत. साधारणपणे चित्रपटांचे फर्स्ट डे शो 9 वाजण्याच्या सुमारास सुरू होतात पण जवानचे शो पहाटेच सुरू झाले आहेत. याचे कारण प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे.
अनेक चित्रपटगृहांबाहेर दिवाळीसारखे वातावरण असते. लोक फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत आहेत. मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये सकाळी ६ वाजताच्या शोमध्ये शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे.
सोशल मीडियावरही चाहते चित्रपटाबद्दल उत्साह दाखवत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती सारखे स्टार्स देखील मुख्य भूमिकेत आहेत. दीपिका पदुकोण आणि संजय दत्त कॅमिओमध्ये दिसणार आहेत.
याशिवाय सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि रिद्धी डोगरा हे स्टार्स सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. ऍटली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. पठाणनंतर शाहरुख खानचा या वर्षातील हा दुसरा चित्रपट आहे. पठाणने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा व्यवसाय केला. जवान यापेक्षाही मोठा हिट ठरेल, अशी अपेक्षा आहे.
COMMENTS