दोरीला काही तरुण दहीहंडी फोडण्यासाठी लटकले असताना भिंत कोसळली. त्यादरम्यान निदा रशीद खान पठाण (९) या मुलीचा मृत्यू झाला.
बुलढाणा । नगर सह्याद्री
राज्यभरात गुरुवारी गोपाळकाल्याचा सण साजरा करण्यात आला. गोविंदांनी मोठ-मोठे थर लावत हंड्या फोडल्या. बुलढाण्यामधील देऊळगाव राजा येथे दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी भिंत कोसळल्याने एका मुलीचा मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
मुंबई ठाण्यात दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये स्पर्धा लागली होती. त्यावेळी दहीहंडी पाहत असताना एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातील मानसिंगपुरा येथे संध्याकाळी आठच्या दरम्यान हा प्रकार घडला. दोरीला काही तरुण दहीहंडी फोडण्यासाठी लटकले असताना भिंत कोसळली. त्यादरम्यान निदा रशीद खान पठाण (९) या मुलीचा मृत्यू झाला.
मुंबईमध्ये दहीहंडी फोडताना यावर्षी 195 गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोपाळकाल्याच्या दिवशी मुंबईत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे गोविंदांना अनेक सामथ्यांना तोंड द्यावे लागत होते.
COMMENTS