आदेशानंतर मराठवाड्यातील १९६७ पर्यंतच्या ३४ लाख अभिलेखांचा अभ्यास करण्यात आला परंतु त्यामधील ४ हजार १६० अभिलेखांवर कुणबी नोंद आढळली आहे.
जालना । नगर सह्याद्री
एकीकडे राज्यामध्ये मराठ्यांना कुणबी दाखला देण्याच्या मागणीने जोर धरला आहे तर दुसरीकडे मराठवाड्यातील तब्बल ९९ टक्के मराठ्यांना कुणबी दाखला मिळणे अशक्य असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे मराठा समाजाच्या मागणीला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिलेख नोंदीतून ही माहिती समोर आली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, तसेच त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी सराटी गावात उपोषण सुरू केले होते. उपोषणाचा आज १६ दिवस असून त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील कुणबी-मराठा समाजाच्या नोंदी शोधा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आहेत.
काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निजामकालीन नोंदी शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. आदेशानंतर मराठवाड्यातील १९६७ पर्यंतच्या ३४ लाख अभिलेखांचा अभ्यास करण्यात आला परंतु त्यामधील ४ हजार १६० अभिलेखांवर कुणबी नोंद आढळली आहे. याचा अर्थ असा की, निजामकालीन वंशावळीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. सरकारने जीआर बदलण्याचा निर्णय घेतला नाही तर, ९९ टक्के मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळणार नसल्याचं अभिलेख तपासातून निष्पन्न झाले आहे.
COMMENTS