नवी दिल्ली / प्रतिनिधी कोरोना व्हायरसने नागरिक जेरीस आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच देशात निपाह व्हायसमुळे भीतीचे वाता...
नवी दिल्ली / प्रतिनिधी
कोरोना व्हायरसने नागरिक जेरीस आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच देशात निपाह व्हायसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केरळमध्ये निपाह व्हायरसची प्रकरणे आढळताच वैद्यकीय संस्थांनी इशारा देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच, निपाह संसर्गामध्ये मृत्यूचे प्रमाण ४०-७० टक्के असल्याचे म्हटले आहे.
केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कोझिकोड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक राजीव बहल म्हणाले की, केरळमध्ये निपाह व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.
सर्व रुग्ण संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेले केंद्रीय पथक कोझिकोड जिल्ह्यात पोहोचले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अंतर्गत १००० हून अधिक लोकांचा शोध घेण्यात आला आहे. याचबरोबर, राजीव बहल यांनी वारंवार हात धुण्यास आणि फेस मास्क घालण्यास सांगितले.
ते म्हणाले "चार ते पाच उपाय आहेत, त्यापैकी काही कोविड विरूद्ध केलेल्या उपायांप्रमाणेच आहेत. जसे की वारंवार हात धुणे, मास्क घालणे. निपाह व्हायरसचा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे आणि त्यानंतर इतर व्यक्तींचा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणे, जे संक्रमित व्यक्तीला भेटले आहेत.
हे टाळण्यासाठी, विलिगीकरण फार महत्वाचे आहे. विलिगीकरण देखील संरक्षणाची एक पद्धत आहे. लक्षणे दिसू लागल्यास, त्या व्यक्तीने स्वतःला विलिगीकरण करावे आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा."
COMMENTS