काही दिवसांनंतर त्यांच्या नात्याबद्दल तरुणाच्या पत्नीला समजल्याने तरुण मृत तरुणींपासून दूर राहत होता.
मुंबई । नगर सह्याद्री
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या एका तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वसईमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी हत्या करून तरुणीचा मृतदेह वापी नदीमध्ये फेकण्यात आला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसांनी तपास करून दोघांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वसईचे स्थायिक असून तो विवाहित होता. तसेच तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉस्टयूम डिझाईन तर मृत प्रियासी मेकअप आर्टिस्ट म्हणून कार्यरत होते. मृत तरुणी आणि आरोपीमध्ये गेल्या ५ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याने ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
काही दिवसांनंतर त्यांच्या नात्याबद्दल तरुणाच्या पत्नीला समजल्याने तरुण मृत तरुणींपासून दूर राहत होता. परंतु तरुणी त्याची साथ सोडण्यास तयार नसल्याने पती पत्नीने ठरवून तरुणीची हत्या करण्याचा कट रचला. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून वापीमध्ये फेकला.
मृत तरुणीच्या बहिणीला तिच्या प्रेमसंबंधाची माहिती होती. बऱ्याच दिवसांपासून बहिणीशी संपर्क न झाल्याने तिने तात्काळ पोलसांत धाव घेऊन दोन्ही पती पत्नी विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी ३०२ कलमा अंतर्गत दोघाना अटक केली आहे.
COMMENTS