Kidney Stone Health : किडनीस्टोन अर्थात मुतखडा हा सामान्य आजार झाला आहे. परंतु यामध्ये तीव्र वेदना होत असतात. मुतखडा झालेल्या रुग्णाला भयानक...
Kidney Stone Health : किडनीस्टोन अर्थात मुतखडा हा सामान्य आजार झाला आहे. परंतु यामध्ये तीव्र वेदना होत असतात. मुतखडा झालेल्या रुग्णाला भयानक वेदनेला सामोरे जावे लागते.
चुकीचा आहार, शरीराचे अतिरिक्त वजन, काही आजार आणि औषधे ही त्याची कारणे सांगितली जातात. परंतु हा आजार झाला की लोक ओप्रेशनऐवजी इतर मार्गानी हा खडा बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असतात. यासाठी काही लोक बिअर पिण्यास सुरुवात करतात.
त्यांना असे वाटते की असे केल्याने मोठे खडेही फुटून लघवीमार्फत निघून जातील. पण बिअर पिऊन खरंच किडनी स्टोन काढता येतो का? याबाबत काही डॉक्टरांनी आपले मत मांडले आहे.
काय सांगतात डॉक्टर ? : डॉक्टर सांगतात की, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की किडनी स्टोन होताच त्यांनी बिअर पिण्यास सुरुवात केली पाहिजे. त्यांना असे वाटते कारण बिअर प्यायल्याने वारंवार लघवीला होते.
लघवीच्या दाबामुळे किडनी स्टोन फुटून लघवीसोबत बाहेर पडतात असा त्यांचा मोठा समज आहे. डॉक्टरांनी या गैरसमजामागील सत्य स्पष्ट केले आणि सांगितले की बिअर आणि किडनी स्टोनचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल आणि तुम्ही तो काढण्यासाठी बिअर प्याल तर त्यामुळे तुमची प्रकृती अधिकच बिघडू शकते. त्यामुले हा पर्याय धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS