नगर सह्याद्री टीम Health Tips : व्यस्त जीवनशैली आणि विविध कामे यामुळे अनेकांना रात्री जागरण करण्याची सवय लागली आहे. अनेकांना नोकरी निमित्ता...
नगर सह्याद्री टीम
Health Tips : व्यस्त जीवनशैली आणि विविध कामे यामुळे अनेकांना रात्री जागरण करण्याची सवय लागली आहे. अनेकांना नोकरी निमित्ताने जागरण करावे लागते. तसेच अनेक लोक मोबाईलच्या अति वापराने देखील जागरण करत असतात. परंतु या रात्रीच्या जागरणाने शरीरावर वाईट परिणाम होत असतात.
शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले असता असे समोर आले की, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका जास्त असतो. तसेच इतर लोकांच्या तुलनेत आजारांना बळी पडण्याचा धोका जास्त असतो. हे संशोधन अनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
संशोधनात असेही म्हटले आहे की, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि दिवसा झोपतात, त्यांच्या झोपेचे चक्र बिघडते. त्यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया बिघडते. त्यामुळे शरीरात चरबी जमा होते आणि टाइप २ मधुमेहासारखे गंभीर आजार होतात.
COMMENTS