HEALTH TIPS : प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेत असतो. यात विशेषतः त्वचा, केस, डोळे आणि नाक यांची जास्त काळजी घेतो. कारण हे ...
HEALTH TIPS : प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेत असतो. यात विशेषतः त्वचा, केस, डोळे आणि नाक यांची जास्त काळजी घेतो. कारण हे अवयव अत्यंत नाजूक आहेत.
परंतु व्यक्ती यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवाकडे लक्ष देत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शरीरात तुम्हाला जर काही बदल दिसले तर तुम्ही लगेच सावध व्हायला हवे. त्याने यकृताविषयी माहिती मिळते. चला जाणून घेऊयात या विषयी -
तळवे सुजणे
तळवे सुजणे किंवा चालताना दुखणे ही एक सामान्य समस्या असू शकते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास फॅटी लिव्हर आजार अधिक धोकादायक ठरू शकतो. द योगा इन्स्टिटय़ूटच्या म्हणण्यानुसार, यकृतामध्ये द्रव साचते किंवा फॅटी लिव्हर आजार होतो तेव्हा तळवे सुजतात.
तळवे गरम राहणे
खूप चालताना तळवे गरम होतात, तर काहींना चपला घातल्यामुळेही हे जाणवू लागते. पण हे यकृत बिघडल्याचे हे एक लक्षण असू शकते हे लक्षात घ्या. याचा अर्थ यकृत योग्य प्रकारे रक्त साफ करत नाही असाही असू शकतो.
तळव्याला खाज येणे
हे लक्षण ओळखण्यास अजिबात उशीर करू नका. कारण हार्ट फेल्युअरमुळे तळव्यांना खाज येते. हार्ट फेल्युअरमुळे, यकृतामध्ये रक्तसंचय होते, ज्यामुळे तळव्याला खाज येऊ लागते.
COMMENTS