नगर सह्याद्री टीम health tips : केळी हे खूप आरोग्यदायी फळ मानले जाते कारण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात . परंतु प्रत्येक फळाचा प्रभाव...
नगर सह्याद्री टीम
health tips : केळी हे खूप आरोग्यदायी फळ मानले जाते कारण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात . परंतु प्रत्येक फळाचा प्रभाव वेगळा असतो. यामुळेच दोन वेगवेगळ्या प्रकारची फळे एकाच वेळी खाल्ल्यास नुकसान देखील होऊ शकते. काही फळे असे आहेत की जे केळीसोबत खाऊ नयेत. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. चला जाणून घेऊयात याबद्दल
केली व पपई सोबत खाऊ नये
केळी हृदय आणि पोटासाठी फायदेशीर आहे, तर पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते दोन्ही फळांचे स्वरूप वेगळे आहे. त्यामुळे त्यांचे एकत्रित सेवन आयुर्वेदात निषिद्ध आहे. केळीचा थंड प्रभाव असतो, तर पपईचा गरम प्रभाव असतो. त्यामुळे पचन खराब होणे, अपचन, उलट्या, डोकेदुखी, मळमळ, गॅस, ऍलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
या स्थितीत पपई टाळा
1. अनेक संशोधनांनुसार, दमा किंवा श्वसनाच्या इतर समस्या असलेल्या रुग्णांना पपई खाल्ल्याने ऍलर्जीचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय मुरुम आणि खाज येण्याची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे पपईचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
2. गर्भवती महिलांना पपई देऊ नये. कारण, त्याचा प्रभाव उष्ण असतो आणि त्यामुळे गर्भाला इजा होऊ शकते.
3. हे खरे आहे की पपईमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेपासून आराम देते. पण, जास्त प्रमाणात फायबर खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. म्हणूनच काळजी घ्या.
4. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर पपईचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कारण पपई देखील रक्त पातळ करण्याचेही काम करते. ज्यामुळे तुम्हाला गंभीर समस्या उद्भवू शकतात.
( येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. माहिती वापरापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा)
COMMENTS